लोणावळा : शहरातील मध्यवर्ती असलेल्या मच्छि मार्केट येथे दारूसाठी पैसे न दिल्याने एकाच्या गळ्यावर ब्लेडने वार करण्याची खळबळ जनक घटना दि.13 रोजी रात्री 9:30 वा.च्या सुमारास घडली.याप्रकरणी सुनील रंगनाथ इंगळे (वय 40, व्यवसाय मजुरी, रा. मच्छिमार्केट लोणावळा, मूळ रा. लक्ष्मी मार्केट सोलापूर ) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अंकुश तुपे (रा. मच्छिमार्केट, लोणावळा ता. मावळ, जी. पुणे ) याच्या विरोधात गु.रजि. नं.104/2024 भादंवीका कलम 307,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अंकुश तुपे याला फिर्यादी ने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही याचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या गळ्यावर ब्लेड ने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.यात फिर्यादी सुनील इंगळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.वगैरे तक्रारीवरुन गुन्हा रजिस्टरी दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहे.पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शखाली पुढील तपास सपोनि पोवार करत आहेत.
शहरातील मच्छि मार्केट परिसरात यापूर्वी ही अशा अनेक घटना घडल्या आहेत.गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडला तरच पोलीस या ठिकाणी लक्ष घालतात इतर वेळेस लक्ष घालत नसल्यामुळे या परिसरात गुन्हेगारी वाढत असून याठिकाणी दारुडे नशेडी लोकांचा वावर जास्त प्रमाणात असतो.येथून रात्री प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. तरीही याठिकाणी पोलिसांनी गस्त घालत या गुन्हेगारांवर चाप बसवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.