दिपकभाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या मेळावा नियोजनाची बैठक लोणावळ्यात संपन्न !

0
111

लोणावळा दि.1: रोजी आर पी आय ( A ) ची मेळावा नियोजनाची बैठक महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दुपारी 2 वाजता लोनावळा शहरातील छत्रपती राजे शिवराय,क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले, महात्मा गांधी,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करून रमामाता आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे ही बैठक पार पडली.

यामध्ये आर पी आय (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत पार पडणारा 13 मार्च 2022 चा मेळावा कशा पद्धतीने ताकदीचा होईल यावर सखोल चर्चा करण्यात आली,यात सभागृह व प्रवेशाचा मार्ग निश्चित करण्यावर चर्चा झाली,नियोजनाच्या संबधी पदाधिका-यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले.मेळाव्याची वेळ निश्चित करण्यात आली,

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव अरूणभाऊ भिंगारदिवे,राजूभाऊ आठवले,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजेंद्र आप्पा गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष कैलासभाऊ केदारी,पश्चिम महाराष्ट्र संघटक माणिक भोसले,पुणे जिल्हा अध्यक्ष विकास साळवे.

पुणे जिल्हा उपाध्यक्ष विलास केदारी,राजगुरूनगर शहराध्यक्ष अनिल डुकरे, सामाजिक कार्यकर्ते नितीन मोरे,पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अंकुश चव्हाण, उपाध्यक्ष विनोद वानखेडे, ओहाळ,सचिव प्रविण पवार,पुणे शहर कार्याध्यक्ष विलास आप्पा घोरपडे,मावळ तालुका युवक अध्यक्ष चंद्रकांत ओहाळ, खेड तालुका युवक अध्यक्ष आकाश डोळस,कामशेत शहराध्यक्ष दिनेश शिंदे,लोनावळा शहराध्यक्ष महेंद्र शिंदे, उपाध्यक्ष कैलास मोरे,जे के गरड,नीता मोरे,शिल्पा जाधव, सोनाली लोहीरे,युवक शहराध्यक्ष निलेश देसाई,पिंपरी चिंचवड महीला शहराध्यक्षा लताताई कांबळे,सचिव अल्का धनवडे, कविता दौंडकर,युवक शहराध्यक्ष नितीन पट्टेकर,पिंपरी चिंचवड शहर सचिव निलेश ओहाळ,माणिक शिंदे,सागर वाघमारे,मंगल सोनवणे,सुरेखा कांबळे,सिंधुताई तुळवे,आदी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली.