![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी):दुधावरे खिंडीत लोहगड येथे फिरायला आलेल्या विध्यार्थ्यांची बस दरीत कोसळून अपघात झाला.
साठे क्लास पेन येथील 72 मुले व शिक्षक असे शाळेच्या बसने लोहगड येथे आलेले होते त्यापैकी एक बस क्र. MH 06 S 9381 ही लोहगड येथून खाली उतरताना दरीत पडून अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून सात ते आठ जण गंभीर जखमी तर काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.जखमींना पुढील उपचारासाठी राणी ॲम्बुलन्स मधून हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच सदर ठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस पथक, शिवदुर्ग टीम यांसह लोहगड ,घेरेवाडी व औंढोली येथील पोलीस मित्र, पर्यटक यांनी अपघातग्रस्तांसाठी मदत कार्य केले. यावेळी लोणावळा लोहगड घेरेवाडी येथील स्थानिक तरुण ,सरपंच नागेश मरगळे, पोलीस पाटील सचिन भोरडे, उपसरपंच गणपत महाराज ढाकोळ, लक्ष्मण साबळे ,दत्तू विखार ,भरत भोरडे ,पंढरी विखार, मयूर ढाकोळ ,चेतन विखार, बाळू गवारी व आदी गग्रामस्थांनी शिव दुर्ग टीमला सहकार्य केले.