Friday, June 14, 2024
Homeपुणेदुसरा प्रेम विवाह करण्यासाठी पत्नीलाच संपवले, पौड येथील घटना, आरोपी जेरबंद….

दुसरा प्रेम विवाह करण्यासाठी पत्नीलाच संपवले, पौड येथील घटना, आरोपी जेरबंद….

पौड (प्रतिनिधी): पहिला प्रेम विवाह झालेला असतानाही तरुणाचा सोबत काम करणाऱ्या तरुणीवर जीव जडला . यातूनच तिच्यासोबत लव्ह मॅरेज करण्यासाठी पत्नीचाच काटा काढल्याची भयानक घटना पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे .
स्वप्नील विभिषण सावंत ( वय 23 , मुळ रा . सांगवी , ता . आष्टी , जि . बीड ) असे आरोपी पतीचे नाव आहे . प्रियांका क्षेत्रे ( वय 22 वर्ष ) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे.
स्वप्नीलने त्याच्या पत्नीला मारण्यासाठी निवडलेली पद्धत सर्वांनाच घाबरवणारी आहे . मुळशी तालुक्यातील घोटवडे फाटा येथे एका खासगी रुग्णालयात स्वप्नील सावंत कामाला होता. प्रियांका क्षेत्रे सोबत प्रेम विवाह झाल्यानंतर ते दोघे कासार आंबोली येथे भाड्याची खोली घेऊन राहत होते . दरम्यान स्वप्नीलचे काम करत असलेल्या रुग्णालयातील एका परिचारिका तरुणीसोबत प्रेम संबंध जुळले . मात्र पहिले लग्न झाले असताना दुसरे लग्न कसे करायचे , या चिंतेने तो ग्रासला होता आणि त्यातूनच त्यांने भयंकर पाऊल उचलले .
पत्नीला कोणताही त्रास नसताना स्वप्नील हॉस्पिटलमधून बीपी आणि शुगरचे इंजेक्शन चोरुन तिला घरी जबरदस्ती देत राहिला . त्याने प्रियांकाला त्रास होऊ लागला आणि त्याने तिला घरातच मारुन टाकले . पण त्यांनंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा बनाव केला . मात्र , डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली . तसेच प्रियांकाच्या कुटुंबीयांनीही त्याच्याबद्दल तक्रार केली . तेव्हा पोलिस तपासात ही सर्व बाब समोर आली . पुढील तपास पौड पोलिस करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page