देणाऱ्याचे हात हजार, आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदत..

0
170

शेलू येथील पूरग्रस्तांना अन्न व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप,हात हजार..आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदत !

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यातील शेवटचे गाव म्हणजे रेल्वे पट्यातील शेलू गाव.कर्जत तालुक्यातील अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे शेलू गाव देखील पाण्याखाली आले.गावातील नागरिकांचे यामुळे अतोनात नुकसान झाले.दोन वेळेचे खाणे मुश्किल झालेल्या कुटुंबांना मदतीचा हात सामाजिक बांधिलकी जपत कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी पुढे करत आपले कार्य जोमाने चालू ठेवून सर्व गावातील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मदत केली आहे.

दि. २१ जुलै ही काळरात्र ठरत यावेळी अनेकांच्या घरात पाणी शिरले.अतिवृष्टीमुळे शेलू येथील अडीचशे कुटुंब,अडीचशे घरं पाण्याखाली गेली होती या कुटुंबांना आधार देत आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप करण्यात आले.


यावेळी कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख,गटविकास अधिकारी बालाजी पुरी,नायब तहसीलदार सुधाकर राठोड, शिवसेना तालुका प्रमुख उत्तमदादा कोळंबे,शेलू गावचे सरपंच शिवाजी खारीक,कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक संकेत भासे,भगत सर, सदस्य रोहन पाटील आणि के बी के नगर मधील सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या या मदतीने पूरग्रस्त नागरिकांना खूपच आधार मिळाला आहे.