Sunday, September 24, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडदेर है-दुरुस्त है,पेण अर्बन ठेवीदारांना ५ लाख मिळण्याचे सुनील गोगटे यांचा दावा..

देर है-दुरुस्त है,पेण अर्बन ठेवीदारांना ५ लाख मिळण्याचे सुनील गोगटे यांचा दावा..

केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवतजी कराड यांनी दिले ठोस आश्वासन..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
रायगड सहीत कर्जतकरांच्या जिवामरणाच्या प्रश्नापुढेही गेलेल्या पेण को.ऑप .अर्बन बँक धुळीस मिळाली असताना ही बँक पुन्हा एकदा अंकुर फुटून देशोधडीस लागलेल्या ठेवीदार व खातेदारांना त्यांच्या जन्माची पुंजी व म्हातारपणातील आधाररुपी रक्कम हातात मिळावी,हा मानस मनात बाळगून भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे हे तयारीला लागले आहेत.

त्या अगोदरही त्यांनी या कायदेशीर लढ्यात उतरून सर्व खातेदारांना साथ दिली असतानाच आजचे त्यांचे प्रयत्न हे लाख – मोलाचे दिसत आहेत.यापूर्वीही त्यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुरागजी ठाकुर साहेब यांची भेट घेऊन पेण को.ऑप.अर्बन बॅंक मोठ्या बँकेत विलीनीकरण करावे किंवा बँकेच्या सर्व मालमत्ता जागा विकून ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे परत द्यावेत ,ही मागणी निवेदनाद्वारे केली होती.

त्यानुसार चक्र फिरली असताना आज त्यांनी पुन्हा एकदा दिल्लीत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवतजी कराड यांची भेट घेऊन या प्रयत्नांना उजाळा दिला.पेण अर्बन बँकेचा आर्थिक घोटाळा होऊन ११ वर्ष उलटून गेली. ही बँक पुन्हा पूर्ववत चालू व्हावी व बँकेत अडकलेली आयुष्यभराची पुंजी खातेदारांना मिळावी , यासाठी भाजप किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे यांचे जोमाने प्रयत्न चालू असून लवकरच यश संपादन होण्याची शक्यता वाटत आहे.

या बँकेत असलेल्या ५०० च्यावर ठेवीदार – खातेदारांना आपली बँकेत अडकून पडलेली कष्टाची पुंजी मागे ठेवून इहलोकीचा निरोप दुःखमय रीतीने घ्यावा लागला.तर पावणे दोन लाख खातेदार आणि त्यांचे कुटुंबीय आर्थिक संकटांना सामोरे जात आहेत ,तर आत्ता कोरोना महामारीच्या काळातही गाठीला पैसे नसल्याने उपासमारीची वेळ खातेदारांवर आहे, लग्नसराई पैसे नसल्याने घरात होतच नाहीत , शिक्षणाला उभारी मिळेनाशी झाली आहे.

त्याची कल्पना मुंबई पासून दिल्ली पर्यंत सर्वाना आहे. म्हणूनच या खातेदारांना न्याय देण्यासाठी भाजप चे कोकण संघटक सुनील गोगटे दिल्लीत ठाण मांडून सध्या ते हिरीरीने पेण अर्बन बँकेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत ,त्यांचा प्रयत्न एक जमेची बाजू म्हणता येईल.आज दिल्लीत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवतजी कराड यांच्या भेटीत पेण को ऑप बँके संदर्भात ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळालेच पाहिजेत.

बँकेचे असेंट विकून पैसे द्यावेत किंवा राष्ट्रीयकृत बँकेत विलीनीकरण करावे ,अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा सुनील गोगटे यांनी केली असता केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार बुडीत बँकेच्या ठेवीदारांना ५ लाख रुपये ९० दिवसाच्या आत द्यावे ,या नियमात पेण को ऑप बँकेच्या ठेवीदारांना पैसे द्यावेत व तसे दिले गेले पाहिजेत , या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकर यावर निर्णय घेऊ , असे आश्वासन भागवतजींं कराड यांनी दिले आहेत.

त्यामुळे पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या असून निदान ५ लाख तरी पदरात पडतीलच , असे मत भाजप कोकण संघटक सुनील गोगटे यांनी सांगितले आहे.या मागणीचे निवेदन देताना भाजप कोकण संघटक सुनील गोगटे यांच्या समवेत कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत आणि अक्षय सर्वगोड उपस्थित होते .

- Advertisment -