![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
कार्ला (प्रतिनिधी):देवघर येथील स्व. वामनराव हैबतराव देशमुख माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांसाठी विजन स्प्रिंग व बजाज फेनशिव संस्थेतर्फे मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर आयोजित करण्यात आले.
सदर शिबिरासाठी शिबिर प्रमुख राम पोले, डॉ. प्रवीण सोलंकी, कौन्सिलर शंकर तारपे, कार्तिक कोठोडे ,सुरेश पिंगळे ,यांनी विद्यालयात 180 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली. सदर तपासणीत 45 टक्के विद्यार्थ्यांना नेत्रदोष आढळून आला . सदर विद्यार्थ्यांना व्हिजन स्प्रिंग संस्थेतर्फे चष्मे तयार करून वाटप करण्यात येणार आहेत.
याप्रसंगी देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक बी बी पाटील ,मनीषा ठीकेकर, भगवंत क्षीरसागर,विजय कचरे विजय गायकवाड, सुभाष भानुसघरे,सुरेश देशमुख यांच्या उपस्थितीत नेत्र तपासणी शिबिर संपन्न.