Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळादेवघर येथील नेत्र तपासणी शिबिरात 477 जणांना मोफत चष्मा वाटप…

देवघर येथील नेत्र तपासणी शिबिरात 477 जणांना मोफत चष्मा वाटप…

लोणावळा (प्रतिनिधी):सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (CFTI) व एकलव्य फौंडेशन आयोजित मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबीर भैरवनाथ मंदिर देवघर येथे आज दि.8 मे रोजी सकाळी 9:00 ते सायंकाळी 4:00 यावेळात संपन्न झाले.
या शिबिरात मोतीबिंदू तपासणी,चष्मा नंबर तपासण्या मोफत करण्यात आल्या तर ज्यांना चष्मा नंबर आहे त्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आला आहे.
यावेळी 597 लोकांनी नेत्र तपासणी करून घेतली त्यापैकी 477 जन चष्म्याचे लाभार्थीं ठरले तर 57 मोतीबिंदू तर 63 नॉर्मल अशा एकूण 597 लाभार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले आहेत. तसेच पुढील 57 मोतीबिंदू रुग्णांसाठी मोफत शस्त्र क्रिया करण्यात येणार असल्याची माहिती एकलव्य फौंडेशनचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी दिली.
या मोफत नेत्र तपासणी शिबिरात जेवरेवाडी,करंडोली, नवखंडेवाडी, देवघर, वाकसई, इंद्रायणी नगर,संत तुकाराम नगर,वाकसई चाळ येथील तरुण तरुणी जेष्ठ नागरिक व महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला तसेच CFTI संस्था व एकलव्य फौंडेशन यांनी राबविलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबीर आणि मोफत चष्मा वाटप या कार्याचे भरभरून कौतुक नागरिकांकडून करण्यात आले,तर हा उपक्रम जेष्ठ नागरिकांसाठी मौल्यवान असल्याच्या प्रतिक्रिया देखील अनेकांनी दिल्या.
या शिबिराचे आयोजन सेंटर फॉर ट्रान्सफॉरमिंग इंडिया व एकलव्य फौंडेशनचे अध्यक्ष प्रवीण देशमुख, विकास धोत्रे, ओंमकार पवार, अविनाश देसाई, विजय देशमुख, सुनील पवार, राहुल वाटाणे, अजय सुरवडकर,गणेश शिंदे, महादेव भवर, सागर धनवटे,विठ्ठल जाधव, व किरण विटेकर आदींनी हे शिबीर पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
- Advertisment -

You cannot copy content of this page