Thursday, September 12, 2024
Homeपुणेमावळदेवघर येथील 26 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..

देवघर येथील 26 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..

वाकसई दि.1: देवघर येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना देवघर येथे रात्री 11:50 वा. च्या सुमारास उघडकीस आली. मयत सचिन रवींद्र देशमुख ( वय 26, रा. देवघर, ता. मावळ, जि. पुणे ) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सदर बाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अनैसर्गिक मृत्यू ची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार शेख करत आहेत.


लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रात्री 01:01 वा. च्या सुमारास गणेश तुकाराम देशमुख ( वय.43, रा. देवघर ) मयताचे चुलते यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला खबर दिली की त्यांचा चुलत भाऊ रवींद्र देशमुख हा रात्री गणेश यांच्या घरी आला आणि माझा मुलगा सचिन हा सायंकाळ पासून कुठे गेलाय माहित नाही.

सर्व नातेवाईकांनी सचिन याला फोन वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु सचिन फोन उचलत नसल्याने सर्व नातेवाईकांनी घराच्या शेजारील डोंगराच्या झाडा झुडपामध्ये त्याचा शोध घेत असताना तेथील एका करंजाच्या झाडाच्या फांदीला मयत सचिन याने सुताच्या रशीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

त्यावेळी त्याच्या नातेवाईकांनी त्याला पाहताक्षणीच उपचारासाठी लोणावळा येथील परमार हॉस्पिटल मध्ये नेले तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून तो मृत असल्याचे घोषित केले. मयत सचिन रवींद्र देशमुख याच्या असा अचानक गळफास घेऊन झालेल्या मृत्यूने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शकील शेख हे पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page