मावळ (प्रतिनिधी) : मावळातील वाकसाई चाळ संत तुकाराम नगर येथील देवीक महादेव भवर याने इचलकरंजी येथील विभागस्तरीय योग स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत 75 विध्यार्थ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने विभागीय शालेय योगासन स्पर्धांचे दि 19 व 20 डिसेंबर रोजी योग भवन इचलकरंजी जि कोल्हापूर या ठिकाणी आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सातारा ,सांगली , कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग व तीन महानगरपालिका सहभागी होते सदर स्पर्धेमध्ये आपल्या मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे संचलित मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा 2 चा विध्यार्थी.
मावळातील देवीक भवर आणि यश भवर या दोन्ही बंधूंनी समता माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षणाबरोबर योगासन चा छंद जोपासला आहे. याच छंदातून या दोन्ही बंधूंनी अगोदर तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि आता विभागीय योग स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्याचे नाव उंचावले आहे. त्यांचा छंद व जिद्द याचे खंडाळा सह मावळ तालुक्यात कौतुक करण्यात येत असून सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
देवीक महादेव भवर आणि यश महादेव भवर या दोन्ही बंधुच्या अनगणीत यशासाठी शाळेतील शिक्षक मुकेश वाघमारे, मुख्याध्यापक माने सर, संस्थेच्या अध्यक्षा खिलारे मॅडम व विकास पाटोळे सर, सचिव पवन सूर्यवंशी आदींचे विशेष परिश्रम लाभले आहे.
अगोदर सातारा जिल्हा क्रीडा विभाग यांच्या माध्यमातून आयोजित खंडाळा तालुका योग स्पर्धेमध्ये लक्ष भवर आणि देविक भवर या दोन सख्या भावंडांनी प्रथम क्रमांक पटकावीत पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेत भरारी मारली, त्यानंतर जिल्हास्तरीय योग स्पर्धेत या दोन बालकांनी बाजी मारत विभागीय स्पर्धेसाठी झेप घेतली होती आणि आता विभागीय योग स्पर्धेत भरारी मारत देवीक भवर याने तिसऱ्या क्रमांकावर यश संपादन केले.