अष्ट दिशा, वृत्तसेवा दि.६ बीड: देशभर गाजलेल्या स्त्री भ्रूण हत्येतील मुख्य आरोपी सुदाम मुंडे पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे गर्भपात करत असल्याचे समोर आले आहे.
डॉ सुदाम मुंडे ची वैद्यकीय पदवी न्यायालयाने कायमस्वरूपी रद्द केले आहे. परंतु तरीही न्यायालयाचे सर्व आदेश धुडकावून सुदाम मुंडे प्रॅक्टिस करत होता. हॉस्पिटलचा परवाना मुंडे यांच्या मुलीच्या नावावर आहे.
जिल्ह्यातील काही लोकांनी सुदाम मुंडेच्या या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे तक्रार केली होती. अखेर आज पहाटे पोलिसांनी परळी येथील नंदागौळ रोडवरील मुंडे हॉस्पिटल वर छापा टाकला. हॉस्पिटल मधील साहित्य जप्त करण्यात आल आहे. तसेच पोलिसांनी सुदाम मुंडेला अटक केली आहे.