Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळादेशमुख विद्यालय देवघर येथील माजी विध्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्यातून शाळेला दिले कपाट भेट..

देशमुख विद्यालय देवघर येथील माजी विध्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्यातून शाळेला दिले कपाट भेट..

लोणावळा (प्रतिनिधी):स्वर्गीय वामनराव हैबतराव देशमुख माध्यमिक विद्यालय देवघर येथे सन 2011/12 वर्षातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला.
माजी विद्यार्थी मेळावा शाळेचे मुख्याध्यापक बी बी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता. पुणे व रायगड जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी व्यवसाय निमित्त स्थायिक झालेले विद्यार्थी मेळाव्यात सहभागी झाले.लग्न करून परगावी गेलेल्या मुली आवर्जून उपस्थित राहिल्या. आपल्याला शिक्षकांनी केलेल्या संस्काराबद्दल विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.माजी विद्यार्थी यांनी आपल्या मनोगतात शाळेची शिस्त, शिकवण आणि आज आपण समाजामध्ये मानाने जीवन जगत आहोत. याचे श्रेयस शाळेतील शिक्षक यांचे आहे अशी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी विद्यालयातील शिक्षक मनीषा ठीकेकर, विजय गायकवाड, विजय कचरे, भगवंत क्षिरसागर, नाईक सुरेश देशमुख इत्यादी उपस्थित होते.तसेच माजी विद्यार्थी विशाल राम येवले, विकास बाळू येवले, योगेश गोपीनाथ येवले,शुभम शंकर शिर्के, योगेश विठ्ठल देशमुख,अजय बाळू शेलार, सुरज चांगदेव कुसाळकर, रोशन यशवंत येवले,निलेश उल्हास येवले,निलेश दत्तात्रय येवले, योगिता विकारी, अक्षदा येवले, काजल येवले, नीलम कारके, योगिता धनवटे,पूजा बोत्रे, माधुरी देशमुख, विद्या देशमुख ,पूजा देशमुख या माजी विद्यार्थ्यांसह शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.त्याचबरोबर माजी विध्यार्थी स्नेह मेळाव्याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शाळेला शिक्षकांसाठी स्टोरेज कपाट आठवण म्हणून भेट दिले.
- Advertisment -

You cannot copy content of this page