देहूरोड आर्मी कॅम्प मध्ये चोरीचा प्रयत्न,,, पती – पत्नी पोलिसांच्या ताब्यात..

0
90

देहूरोड : पती – पत्नीने देहूरोड येथील आर्मी लिव्हिंग कॅम्प एरियात चोरी करण्याचा प्रयत्न केला असताना दोघांनाही देहूरोड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.सदरची घटना शुक्रवार दि.20 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी चरण शंकर काळे ( वय 25 ) , निकिता चरण काळे ( वय 19 , दोघे रा . किन्हईगाव , ता . हवेली ) अशी अटक केलेल्या पती – पत्नीची नावे आहेत.

याप्रकरणी पठाण अमजदखान ( वय 42 , रा . देहूरोड ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी हे आर्मीमध्ये नोकरी करतात . ते देहूरोड येथील आर्मी लिव्हिंग कॅम्प एरियात पेट्रोलिंग करीत होते . त्यावेळी आरोपी आर्मी लिव्हिंग एरियात ठेवलेले दीड हजार रुपये किमतीचे जुने लोखंडी सामान पोत्यात भरून चोरी करण्याचा प्रयत्न करताना आढळून आले . फिर्यादी यांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली केले . पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.