देहूरोड दि.3: देहूरोड येथील एका 20 वर्षीय तरुणीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
त्यांच्या समवेत इतर दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती देहूरोड पोलिसांनी दिली. त्या प्रकरणी आरोपी नोमान उर्फ आरबाज जावेद खान ( वय 19), सुल्तान उर्फ मुश्ताक सलीम सय्यद ( वय 32), रियाज उर्फ मन्नन जावेद खान (वय 19), व सोहेल शेरअली पिरजादे ( वय 21) सर्व राहणार मामूर्डी, देहूरोड या चोघांना अटक केली असून आरोपी बिट्टू उर्फ हमीद जावेद खान व झाहेद उर्फ रॉयल निन्जा उर्फ सोन्या रशीद खान या दोघांविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्या विरोधात फिर्यादी पीडित तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार आरोपी मुश्ताक सय्यद याने फिर्यादी व आरोपी आरबाज खान यांच्या शारीरिक संबंधाचा व्हिडीओ काढला व तो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी मुश्ताक सय्यद याने त्या तरुणीवर बलात्कार केला. त्याचप्रमाणे इतर आरोपींनी सुद्धा तो अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादी तरुणीवर जानेवारी 2021 ते मे 2021 या कालावधीत वेळोवेळी सामूहिक बलात्कार केला.
तसेच आरोपी आरबाज खान याने फिर्यादी तरुणीला मारहाण केली. तिला व तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे दिलेल्या फिर्यादित नमूद केले आहे. सदर कारवाई करून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील करत आहेत.खूप लाजिरवाणी घटना आहे देश स्वतंत्र झाला, महिला व पुरुष एकमेकांसोबत काम करू लागले. आज स्त्री पुरुषाच्या तुलनेत कुठेच मागे नाही परंतु एकाच गोष्टीचे वाईट वाटते की येवढे करूनही स्त्री सुरक्षित नाही.
महिलांवरील अत्याचार थांबावा महिला व तरुणी सुरक्षित राहून समाजात आपली ओळख निर्माण करावी यासाठी पोलीस प्रशासन महिलांच्या सुरक्षे साठी सदैव तत्पर असतानाही स्त्री वरील अत्याचार अजून थांबलेले नाहीत.महिलांच्या सुरक्षेप्रति पोलीस आपली कामगिरी चोख पार पाडत असले तरी स्त्री जातीचा स्वाभिमान वाचवीने तिचा सन्मान वाढविण्यासाठी स्त्रियांबरोबर समाजातील इतर नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. त्याशिवाय स्त्री जातीचे रक्षण होणार नाही.
असे कृत्य करणाऱ्या नराधमांनी एकच लक्षात ठेवले पाहिजे की स्त्री ही समाजातील प्रमुख घटक आहे. तीची सुरक्षा ही समाजाची सुरक्षा आहे. तिच्याबद्दल वाईट लेखणाऱ्यानो ती कोणाची आई असू शकते , बहीण असू शकते तर कोणाची पत्नी असू शकते स्त्री ही सर्वस्वी आहे. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना अशी कठोर शिक्षा झाली पाहिजे की ती पाहून स्त्री बद्दल कोणाच्या मनात वाईट विचारही येणार नाही.