Friday, June 14, 2024
Homeपुणेमावळदोन वर्षांनंतरही राजीनामा न दिल्याने वेहेरगाव सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर, लवकरच...

दोन वर्षांनंतरही राजीनामा न दिल्याने वेहेरगाव सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर, लवकरच मिळणार नवीन सरपंच…

लोणावळा (प्रतिनिधी):वेहरगाव दहिवलीच्या सरपंचां विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख व ग्रामसेवक गणेश आंबेकर यांच्या उपस्थितीत दि.15 रोजी हा ठराव मंजूर करण्यात आला.

वेहरगाव दहिवली ग्रुपग्रामपंचातीच्या झालेल्या विशेष बैठकीत सरपंच अर्चना देवकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव ग्रामपंचायत सदस्यांनी सात मतांनी मंजूर केला. या वेळी या सभेला मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख व ग्रामसेवक गणेश आंबेकर यांनी अंतिम मंजुरी दिली.

वेहरगाव दहिवली ग्रुपग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य आहेत.अर्चना देवकर यांना सरपंचपद मिळून दोन वर्ष होऊन देखील सरपंचपदाचा राजीनामा न दिल्याने त्यांच्याविरोधात सात सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी वेहरगाव ग्रामपंचायत कार्यालयात येऊन विशेष सभा घेऊन हा ठराव मंजूर करण्यात आला. या वेळी ग्रामसेवक गणेश आंबेकर यांनी लेखनिक म्हणून काम पाहिले.

तसेच यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच काजल पडवळ, सदस्य सुनील येवले, शंकर बोरकर, अनिल गायकवाड, सदस्या योगिता पडवळ, पूजा पडवळ, वर्षा मावकर यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले.


तर सदस्य राजू देवकर यांचे एक मत तटस्थ राहिले तर यावेळी सरपंच अनुपस्थित राहिल्या होत्या. लवकरच ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलवून नव्या सदस्याची सरपंचपदी नियुक्ती केली जाणार असल्याचे उपस्थित सदस्यांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

You cannot copy content of this page