धनगर समाजाचा आरक्षनासाठी 16 आक्टोबर ला राज्यभर रस्ता रोको चक्काज्याम आंदोलन..

0
144

प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे
लोणावळा महाराष्ट्रात मराठा आरक्षण पाठोपाठ आता धनगर समाजानेही आक्रमक पवित्रा घेत धनगर समाजाला एसटी चे आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाने आक्रमक पवित्रा घेत येत्या 16 आक्टोबर ला सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यभर ररस्ता रोको चक्काज्याम आंदोलन करण्यात येणार आहे.
धनगर आरक्षण लढा समनव्यक समिती यांची दिशा निश्चित बैठक काल लोणावळ्यात कृष्णाई रिसॉर्ट येथे पार पडली, यावेळी समाजातील बांधवांची मते जाणून घेत पुढील आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली.

यावेळी धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे,रामराव वडकूते, माजी मंत्री,आण्णा डांगे, ऑल इंडिया धनगर समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, गणेश हाके, बबन खरात, भरत कोकरे, बबन शेडगे, आप्पासाहेब आखाडे आदींसह अनेक समाज बांधव उपस्थित होते.