धनगर समाजाचे नेते बबन शेडगे यांच्या गाडीचे टायर अज्ञात चोरट्यांनी चोरले..

0
198खोपोली- दत्तात्रय शेडगे.


धनगर समाजाचे नेते आणि दस्तूरी येथे राहणारे ग्रामस्थ बबन शेडगे यांच्या स्विफ्ट कार गाडीचे टायर अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहेे.


बबन शेडगे यांच्या मालकीची स्विफ्ट कार गाडी (क्रमांक एम एच १२ इ जी १९९२ ) ही असून ती दस्तूरी येथील अमृतांजन ब्रिज च्या खाली जनावरांचा गोठा (वाडा ) शेजारी उभी करून ठेवली असता काल रात्री अज्ञात चोरट्यांनी तिचे पुढील दोन टायर चोरून नेल्याची घटना घडली आहेे.


याबाबत शेडगे यांनी खोपोली पोलिसांत अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दिली असून खोपोली पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.


बबन शेडगे हे धनगर समाजाचे जेष्ठ नेते असून ते रासपचे माजी जिल्हाध्यक्ष राहिले आहेत.