Thursday, September 28, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडधनगर समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन…

धनगर समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन…

खोपोली- दत्तात्रय शेडगे.


जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था रायगड यांच्या वतीने धनगर समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.हे स्नेहसंमेलन शनिवार दिनांक २० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता वासगाव पो नागोठणे ता रोहा जी रायगड याठिकाणी आयोजित करण्यात आले आहेे.


जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था रायगड यांच्या वतीने दरवर्षी धनगर समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते.त्याचप्रमाणे यावर्षीही याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी सायंकाळी ५ वाजता स्नेहसंमेलनाचे उदघाटन ,मान्यवरांचा सत्कार समारंभ, नवीन कार्यकारिणी तयार करणे, प्रमुख मान्यवरांचे मनोगत, समाजातील सामाजिक व शैक्षणिक, अडीअडचणीवर चर्चा करणे, आदीसह अनेक आयत्या वेळेच्या विषयांवर, चर्चा करणे आदी कार्यक्रम होणार आहेत.

तरी या धनगर समाजाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेचे रायगड जिल्हा सचिव लक्ष्मण ढेबे यांनी यांनी केले आहे.

- Advertisment -