धनगर समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढा, देण्यासाठीच सह्याद्री कोकण धनगर महासंघाची स्थापना..

0
46

प्रतिनीधी-दत्तात्रय शेडगे

लोणावळा -महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या दोन नंबर ला असूनही आजही धनगर समाजाचा सर्वांगीण विकास झालेला नाही, तर काही वाड्या वस्त्यांवर आजही, वीज, रस्ता पाणी, यासारख्या मूलभूत सुविधा पोहचल्या नाहीत, यासाठी कोकण आणि सह्यादी पठारावरील समाज बांधव एकत्र येत आज धनगर समाजाला न्याय हक्क, तसेच त्याच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सह्याद्री कोकण धनगर महासंघाची स्थापना करण्यात आली.
यासाठी समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती, बैठक काल लोणावळा येथील श्रीसंत बाळूमामा मंदिरात पार पडली, तर धनगर आरक्षणाबरोबर अजूनही धनगर समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत, यात प्रामुख्याने धनगर वाड्या वस्त्यांवर वीज, रस्ता पाणी, शिक्षणाची गौरसोय, मेंढपालावर होणारे हल्ले, यासारखे मुख्य समस्या आजही प्रलंबित आहेत.
या मागण्या सरकार दरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी समाज बांधव एकत्र येत आज कोकण सह्याद्री धनगर महासंघ स्थापन करण्यात आला असून या महासंघाच्या माध्यमातून गोर गरीब समाजाचे प्रश्न व त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवुन न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी पै, आप्पासाहेब आखाडे, विजय बोडेकर, बाबुराव कोकरे बबन शेडगे,बबन खरात, राजाभाऊ जागळे, पी व्ही कोकरे, पांडुरंग शेळके, नारायण माने, रामभाऊ मरंगळे, लक्ष्मण जानकर, विठ्ठल खरात, अशोक भोजे, राजाराम शिंदे बाळू जानकर, बापू खुटेकर, राजेश झोरे, कोंडीबा शिंदे आदी समाज बांधव उपस्थित होते.