Wednesday, September 27, 2023
Homeपुणेधनगर समाजाच्या मागण्यांसाठी रक्ताने लिहून देणार महाराष्ट्रातील सर्व तहसीलदारांना निवेदन,-...

धनगर समाजाच्या मागण्यांसाठी रक्ताने लिहून देणार महाराष्ट्रातील सर्व तहसीलदारांना निवेदन,- डॉ शशिकांत तरंगे

खोपोली- दत्तात्रय शेडगे
धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधत धनगर ऐक्य अभियांन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 13 ऑगस्ट रोजी धनगर समाजाच्या मागण्यांसाठी रक्ताने लिहून निवेदन महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार यांना देण्यात येणार असल्याची माहिती धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्याचे प्रमुख डॉ शशिकांत तरंगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने धनगर समाजाला एसटी प्रवर्ग ची अमलबजावणी करा, धनगर समाजासाठी शासन निर्णयानुसार घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करा, व 1000 कोटी रुपयांची तरतूद त्वरित करा, मेंढपालवरील हल्ले थांबवून त्यांना संरक्षण द्या, या मागण्यासाठी धनगर ऐक्य अभियानामार्फत महाराष्ट्रातील तहसिलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत 13 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सगळ्या तहसीलदार यांना रक्ताने लिहून समाजाच्या मागण्याचे पत्र देणार असल्याचे माहिती धनगर ऐक्य अभियानाचे प्रमुख डॉ शशिकांत तरंगे यांनी दिली आहे.तर सरकारने आमच्या निवेदनाची दखल घेऊन त्वरित अमलबजावणी करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही डॉ शशिकांत तरंगे यांनी दिला आहे.

- Advertisment -