Wednesday, May 29, 2024
Homeपुणेमावळधनगर समाजाच्या मागण्यांसाठी रक्ताने लिहून देणार मावळ तालुक्यातील तहसीलदारांना..

धनगर समाजाच्या मागण्यांसाठी रक्ताने लिहून देणार मावळ तालुक्यातील तहसीलदारांना..

खोपोली- दत्तात्रय शेडगे. धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधत धनगर ऐक्य अभियांन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 13 ऑगस्ट रोजी धनगर समाजाच्या मागण्यांसाठी रक्ताने लिहून निवेदन महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार यांना देण्यात येणार असून आम्ही मावळ तालुक्यातील तहसीलदार यांना धनगर ऐक्य अभियान यांच्या वतीने निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती धनगर समाजाचे नेते तथा मोरवे ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजयं कोकरे यांनी दिली आहे.

धनगर समाजाला एसटी प्रवर्ग ची अमलबजावणी करा, धनगर समाजासाठी शासन निर्णयानुसार घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करा, व 1000 कोटी रुपयांची तरतूद त्वरित करा, मेंढपालवरील हल्ले थांबवून त्यांना संरक्षण द्या, या मागण्यासाठी धनगर ऐक्य अभियानामार्फत महाराष्ट्रातील तहसिलदार यांना निवेदन देण्यात असून आम्ही मावळ तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देणार आहेत, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत धनगर ऐक्य अभियान यांच्या वतीने मावळ तालुक्यातील तहसिलदार यांना धनगर समाजाच्या मागण्यांसाठी रक्ताने पत्र लिहून निवेदन देणार असल्याची माहिती माजी सरपंच संजय कोकरे यांनी दिली आहे.

तर सरकारने आमच्या निवेदनाची दखल घेऊन त्वरित अमलबजावणी करावी अन्यथा धनगर ऐक्य या अभियानाचे प्रमुख डॉ शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी सरपंच संजय कोकरे यांनी दिला आहे

- Advertisment -

You cannot copy content of this page