पेन तालुका धनगर समाजाने दिला मदतीचा हात..
खोपोली(दत्तात्रय शेडगे )
कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड ,चिपळूण मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे येथील काही नागरिकांना आजही आपले घरदार सोडुन दुसरीकडे राहावे लागते अशा चिपळून मधील पूरग्रस्त नागरिकांना पेन तालुका धनगर समाजाच्या वतीने एक हात मदतीचा देऊन त्यांना जीवनावश्यक गृहोपयोगी वस्तुसह मुक्या प्राण्यांना सरकी पेंड आणि चुणी वाटप करण्यात आली.
चिपळूण मधील काजूवाडी, नंदिवसे, ओवली, कादवड, कळकवणे, खडपोळी,गावातील नागरिकांची धनगर समाज पेनच्या पदाधिकारी यांनी भेट घेऊन त्यांना गृहोपयोगी वस्तुसह मुक्या प्राण्यांना सरकी पेंड, व चुणीचे वाटप करण्यात आले,
यावेळी पेन तालुका धनगर समाज अध्यक्ष राजू रेखु आखाडे सचिव लक्ष्मण मरगला, सल्लागार विठ्ठल रामा बोडेकर, युवा नेते विजय उघडे, जिल्हा सदस्य लक्ष्मण गोरे, रवी बोडेकर, सुनील गोरे, संजय तिवले, केशव आखाडे धाऊ आखाडे, विशाल झोरे, रामा बोडेकर हरेश हिरवे, आदी उपस्थित होते