Wednesday, September 27, 2023
Homeपुणेमावळधनगर समाजाच्या वतीने दिले मावळ तहसीलदाराना रक्तलिखित निवेदन..

धनगर समाजाच्या वतीने दिले मावळ तहसीलदाराना रक्तलिखित निवेदन..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 13 आगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत सकल धनगर समाज मावळ तालुका यांच्या वतीने मावळ तालुक्याच्या नायब तहसीलदार चाटे यांना रक्तलिखित निवेदन देण्यात आले.


धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतीथीचे औचित्य साधत धनगर ऐक्य अभियानाचे प्रमुख डॉ शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्याचे नायब तहसीलदार चाटे याना आज रक्तलिखित निवेदन देण्यात आले.


या निवेदनात धनगर समाजाला एसटी प्रवर्ग आरक्षणाची तात्काळ अमलबजावणी करा, धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करून 1000 कोटी ची ताबडतोब तरतूद करा, मेंढपालाना संरक्षण देऊन त्यांच्यावर होणारे हल्ले थांबवा,
या मागण्यासाठी आज मावळ तालुका धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळीं मावळ तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष बबन खरात, मा सरपंच संजय कोकरे, सामाजिक कार्यकर्ते अमोल ठोंबरे, महेश ठोंबरे, तुषार शेडगे, भावेश ठोंबरे, गोविंद कोकरे, नाऊ हिरवे आदींसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

- Advertisment -