Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडधनगर समाज सेवा संघांच्या वतीने बबन झोरे यांचा सत्कार..

धनगर समाज सेवा संघांच्या वतीने बबन झोरे यांचा सत्कार..

खोपोली- दत्तात्रय शेडगे.

धनगर समाज सेवा संघ रायगड यांच्या वतीने गोल्ड मेडल मिळवणारे बबन झोरे याचा सत्कार करण्यात आला
खालापूर तालुक्यातील वाघेश्वर येथे राहणाऱ्या बबन झोरे याने नवी दिल्ली येथे झालेल्या (५९ वजन गटात ) पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ४ गोल्ड मेडल मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावला तर या स्पर्धेतील स्ट्रॉंग मॅन पुरस्कारही आपल्या नावावर कोरला याची दखल घेत धनगर समाज सेवा संघ रायगड यांच्या वतीने बबन झोरे यांच्या घरी जाऊन त्यांचा यथोचीत सत्कार केला.

बबन झोरे याने देशाचे ,राज्याचे जिल्ह्याचे आणि गावाचे व समाजाचे नाव मोठे केल्याचा सार्थ अभिमान असून बबन ने अजून मोठे यश मिळवावे यासाठी संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी धनगर समाज सेवा संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष विलास खताल, खालापुर तालुकाध्यक्ष ईश्वर गोरे,नारायण हिरवे, संतोष घाटे, सुनील घाटे, कर्जत तालुकाध्यक्ष रामा गोरे, यशवंत गोरे, गणेश गोरे बळीराम गोरे दत्तात्रय थोरबोले आदीसह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

- Advertisment -