Monday, March 4, 2024
Homeमहाराष्ट्रनंदुरबार अँग्लो उर्दू हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला..

नंदुरबार अँग्लो उर्दू हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला..


दि.27.जिल्ह्यातील प्रसिद्ध उर्दु शैक्षणिक संस्था अँग्लो उर्दु हायस्कुल नंदुरबार येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले विज्ञान प्रोजेक्ट बनवून ते प्रदर्शित केले आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयावर वक्तृत्व (भाषण) दिले.

प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ वैज्ञानिक डॉ सी.वी. रमण यांचे जीवन व कार्य यावर विद्यार्थ्यांना भाषणातून प्रकाश टाकला.
खान जुबिया फयाज, मारिया रफीक जहाँगीरदार , शिफा नाज हफीज शेख , मारिया अशफाक पिंजारी, मन्यार आयशा शफीक , या विद्यार्थ्यांनी आपले भाषण उत्तमपणे प्रस्तुत केले.


या दिना निमित्त अँग्लो उर्दू हायस्कुल नंदुरबार शाळेतील विज्ञान शिक्षक शकील हुसेन सर, शकील इस्माईल सर,जाकीर रजियोद्दीन सर, आसीफ इकबाल सर, अबरार सर ,जरीफ सर आणि कार्यक्रम संचालक कादरी मोहम्मद इकराम सर या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विज्ञान विषय व त्यातील शाखा संबंधी माहिती दिली.


शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष खान फयाज सर तसेच उपमुख्याध्यापक कमर रजा सर,पर्यवेक्षक नासीर खान सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .

- Advertisment -

You cannot copy content of this page