Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडनगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या कडून गणेशविसर्जन स्थळाची पाहणी..

नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या कडून गणेशविसर्जन स्थळाची पाहणी..

नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या कडून गणेशविसर्जन स्थळाची पाहणी !

माथेरान :-दत्ता शिंदे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. सोशल डिस्टनिंग ठेऊन प्रत्येकाने आपापल्या जबाबदारी वर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे .

त्यामुळे सर्वांचा आवडता सण असलेल्या गणेशोत्सव काळात शासनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी गणेशवीसर्जन वेळेस येथील शारलोट लेक आणि वॉकर्स टँक(बादली)याठिकाणी जाऊन या स्थळांची तसेच येथे सुरक्षा विषयी पहाणी दौरा केला.


रस्ते,लाईट ची व्यवस्था ह्याची सुध्दा नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी पाहणी  केली.यावेळी त्यांच्या सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे,मुख्याधिकारी  प्रशांत जाधव,नगरसेवक राजेंद्र शिंदे, अभियंता  चेतन तेलंगे,शिवसेना महिला आघाडी माथेरानच्या ,चंद्रकांत शेट्ये,कैलास सोनवणे,अर्जुन पारधी आदी उपस्थित होते.

सर्वांनी शासनाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करत गणेशोत्सव आनंदाने साजरा करून स्वतःची व इतरांची सुध्दा सुरक्षीत काळजी घ्यावी असे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सांगितले आहे. 

- Advertisment -

You cannot copy content of this page