Sunday, September 24, 2023
Homeपुणेवडगावनगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्यावतीने वडगाव शहरातील रिक्षा चालकांना गणवेश वाटप...

नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्यावतीने वडगाव शहरातील रिक्षा चालकांना गणवेश वाटप…

वडगाव दि.1:वडगाव शहरातील महादजी शिंदे रिक्षा संघटनेच्या सर्व रिक्षाचालकांना नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्यावतीने गणवेश वाटप करण्यात आले आहे.


कोरोनाच्या काळात वडगाव शहरातील नागरिकांना अहोरात्र अविरत सेवा पुरवणाऱ्या श्रीमंत सरदार महादजी शिंदे रिक्षा संघटनेच्या नामफलकाचे अनावरण नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.


सर्व सामान्य नागरिकांना कोणत्याही कठीण परिस्थितीत सेवा देणाऱ्या सर्व रिक्षाचालकांचे वडगावकर नागरिक सदैवच ऋणी राहतील. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून सर्व रिक्षाचालकांचे ऋण व्यक्त करावे या नात्याने सामाजिक बांधिलकी जपत नगराध्यक्ष मयूर दादा ढोरे यांच्या वतीने शहरातील रिक्षाचालक बांधवांना गणवेश भेट देऊन आभार व्यक्त केले.


यावेळी नगरसेवक राहुल ढोरे, प्रविण ढोरे आणि रिक्षा संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य उपस्थित होते.

- Advertisment -