नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या स्वखर्चातून ठाकरवस्ती व घरकुल परिसरात 20 कॉटचे वाटप…

0
40

वडगाव : सामाजिक बांधिलकी जपत नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या स्वखर्चातून ठाकरवस्ती व घरकुल भागातील रहिवाशांना वीस लोखंडी खाॅट वाटप करण्यात आल्या.मावळात मागील चार ते पाच दिवस सलग पाऊस पडत असल्याने अनेक गोरगरिबांचे नुकसान झाले आहे.


वडगाव शहरातील ठाकरवस्ती तसेच घरकुल या ठिकाणी राहणाऱ्या गोरगरीब रहिवाशांच्या घरात पावसाच्या पाण्याने ओलावा पसरला असून घरातील जमिनीवर झोपणे मुश्किल झाले आहे तर काही जणांना घरातील ओलाव्यात झोपण्यासाठी काही सोय उपलब्ध होत नसल्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत नगराध्यक्ष मयूरजी ढोरे यांच्या स्वखर्चातून ठाकरवस्ती तसेच घरकुल याभागातील काही गोरगरीब कुटूबांना २० नवीन लोखंडी खाॅट घरपोच जाऊन देण्यात आल्या.


यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. या मदतकार्यामुळे गोरगरीब नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगराध्यक्ष मयूर ढोरे यांचे विशेष आभार मानले.