Tuesday, February 7, 2023
Homeपुणेवडगावनगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या स्वखर्चातून आदिवासी बांधवांसाठी सुलभ शौचालय...

नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या स्वखर्चातून आदिवासी बांधवांसाठी सुलभ शौचालय…

मावळ (प्रतिनिधी): वडगांव मावळ मधील माळीनगर परिसरातील आदिवासी भागात नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या वैयक्तिक स्वखर्चातून सुलभ शौचालयाची उभारणी करण्यात आली.
वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 12 माळीनगर परिसरातील ठाकरवाडी भागात राहणा-या गोरगरीब कुटुंबीयांतील सदस्यांच्या सुलभ शौचालयाचा खूप दिवसांपासून प्रलंबित प्रश्न नगराध्यक्ष मयूर ढोरे व अबोली ढोरे यांच्या स्वखर्चातून मार्गी लागल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त करत नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि अबोली ढोरे यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
सदर प्रलंबित प्रश्नाबाबत मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी ठाकरवाडी भागातील महिला भगिनींनी मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्याशी संपर्क साधला आणि सदर काम करून देण्याबाबत मागणी केली. आदिवासी बांधवांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने अबोली ढोरे यांनी एक आठवड्यात तुमच्या भागातील काम सुरू होईल असे आश्वासन महिला भगिनींना दिले होते. आणि आज प्रत्यक्षात सहा दिवसांतच ठाकरवाडी परिसरातील काम मार्गी लागले.
- Advertisment -

You cannot copy content of this page