Thursday, September 19, 2024
Homeपुणेवडगावनगराध्यक्ष मयूर ढोरे यांचा वडगावमधील भोई समाजाच्या वतीने सन्मान....

नगराध्यक्ष मयूर ढोरे यांचा वडगावमधील भोई समाजाच्या वतीने सन्मान….

वडगाव मावळ दि.5: सामाजिक बांधिलकी जपत नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या स्वखर्चातून वडगाव शहरातील सर्व भोई समाज बांधवांना मत्स्य व्यवसायासाठी जाळे भेट देण्यात आले. वडगाव शहरात निःस्वार्थी व प्रामाणिकपणे मासेमारी करणारा भोई समाज मोठ्या प्रमाणावर आहे. पंरपंरेनुसार ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांची पालखी उचलण्याचा सर्वप्रथम मान याच भोई समाजाला असतो.


या समाजाला शासन स्तरावर पहिल्यापासून दुर्लक्षित केले जाते त्यातच कोरोनाच्या काळात सर्वच व्यवसायांवर मोठे संकट ओढवल्याने अनेक व्यवसाय मोडकळीस आले आहेत. सध्या कोरोनाचा प्रभाव कमी होत असून आता कुठेतरी परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.


आज वडगाव शहरातील प्रमुख घटक असलेल्या भोई समाजाचा मुख्य व्यवसाय मासेमारी आणि मासेमारी ही जाळे वापरूनच केली जाते. यासाठी लागणारे जाळे शहरातील सर्वच समाज बांधवांना उपलब्ध करून द्यायचे असा विचार नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या मनामध्ये घोळत होता.


आज अखेर नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, मा सरपंच बापूसाहेब वाघवले यांच्या उपस्थितीत शहरातील सर्व समाज बांधवांना मासेमारी करण्यासाठी जाळे वाटप करण्यात आले.यावेळी भोई समाजाच्या वतीने नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांचे विशेष आभार व्यक्त करत सन्मान करण्यात आला.


या छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक राजेंद्र कुडे, मा सरपंच बापूसाहेब वाघवले, मा उपसरपंच बाळासाहेब दौंडे, नाना वाघवले, बंटी वाघवले आणि सर्व भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शहरातील प्रथम नागरिक या नात्याने सामाजिक बांधिलकी जपत नगराध्यक्ष मयूर ढोरे हे शहरातील वंचित व आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून पुढील काळात मत्स्य उद्योगाला प्रोत्साहन देऊन हा उद्योग अधिक विकसित होण्यासाठी शहरातील समाज बांधवांना मासेमारी करण्याकरिता बोटी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या माध्यमातून शासन स्तरावर निस्वार्थी प्रयत्न करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी बोलताना दिली.

- Advertisment -

You cannot copy content of this page