नढाळ धरणात एका तरुणाचा बुडून मृत्यू.. मृतदेह शोधण्यात अपघातग्रस्त टीमला यश..

0
57

खालापुर (दत्तात्रय शेडगे ) तालुक्यात नढाल येथील धरणात एका 25 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली.


खालापुरातील नढाळ येथे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या फार्महाऊसवर फिरण्यासाठी मुबंई येथील नऊ तरुण आले होते मात्र तलावात पोहण्यासाठी गेलेला पार्थ कोरा वय 25 रा मुलुंड, याला पोहता येत असल्याने व खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो काल सायंकाळी बुडाला.


याची माहिती मिळताच अपघात ग्रस्त सामाजिक संस्था आणि फायरब्रिगेड टीम खोपोली यांनी मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना मृत्यूदेह मिळाला नाही.मात्र त्यांनी आज सकाळी शोधमोहीम पुन्हा चालू केली असून त्यांना आज सकाळी मृतदेह आढळून आला.