नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्षे पूर्ण व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना कौटुंबिक धान्य वाटप..

0
87

(भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)

भारतीय जनता पक्ष हा देशाची सेवा हेच संघटन या पायाभूत विचारांवर उभी राहिली असल्याने आज याच सेवेच्या व मदतीचे हात पुढे करत असल्यानेच भक्कमपणे उभी राहिलेली दिसत आहे , म्हणूनच आज देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत.

या शुभदिनाचे व लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार दि. २ जुन २०२१ रोजी कर्जत तालुक्याचे धडाडीचे भाजप सरचिटणीस राजेशदादा भगत आणि नरेश जोशी उपाध्यक्ष कर्जत तालुका भाजप यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील १० आदिवासी वाडीतील वस्तीवर ४५० गरीब कुटुंबाना दैनंदिन जीवनात लागणारे धान्य , रेशन व वस्तूंचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेशभाऊ म्हसकर , सरचिटणीस संजय कराळे,जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे , कर्जत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अशोकशेठ ओसवाल , किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे ,
अनुसूचित जाती मोर्चाचे प्रभाकर पवार , चिंचवली ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया भगत , रोशन पाटील , संदेश कराळे , प्रभाकर पाटील , प्रकाश पाटील , महेश भगत , उद्योग मोर्चाचे मंदार मेहेंदळे , दर्शन कांबरी , जयदास जाधव ,आत्माराम पवार , केशव तरे आदी मान्यवर उपस्थित होते.


कर्जत – खालापूर मतदार संघात भाजपाची यशस्वी घोडदौड चालू आहे . कोरोना काळात पदाधिकारी व कार्यकर्ते रुग्णांना सहकार्य करत आहेत . तर आता दि. २ जुन २०२१ रोजी आदरणीय लोकनेते व दानशूर व्यक्तिमत्त्व रामशेठ ठाकूर व मा.नरेंद्र मोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण झाली याचे औचित्य साधून गोरगरीब – गरजू कुटुंबाना धान्य वाटप करण्यात आले . यावेळी वाकस – १५ कुटुंब ,नेवाली – १५ कुटुंब , एकसल – ६० कुंटुंब ,खांडपे – ३० कुटुंब ,भानसोली – ६० कुटुंब ,आंबिवली – ३० कुटुंब ,माणगाव – ३० कुटुंब , अस्सल – १५ कुटुंब , झेंडेवाडी – ५५ कुटुंब ,बोरवाडी – ६० कुंटुंब अशा एकूण १० ठिकाणी ४५० कुटुंबांना मोफत धान्य आणि किराणा सामानाचे वाटप करण्यात आले . कोरोनाच्या पडत्या व रोजगार अभावी काळात गोरगरीब , आदिवासी कुटुंबांना मिळालेली मदत नक्कीच या शुभदिनाचे औचित्य साधून वाटल्याने सार्थकी ठरेल .