Saturday, November 9, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडनवजात बालकांच्या मृत्यूचे व विकृतीचे प्रमाण कमी करण्यासाठी एच बी एन सी...

नवजात बालकांच्या मृत्यूचे व विकृतीचे प्रमाण कमी करण्यासाठी एच बी एन सी किटचे वाटप !

शिवसेना ( उ बा ठा ) उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांचा पुढाकार…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) – कर्जत – खालापूर तालुके हे आदिवासी बहुल भाग आहेत . या भागात शिक्षण , कमी वयात लग्न , दोन बाळात अंतर नसणे , पौष्टिक आहाराची कमतरता , स्वच्छता नसणे , अश्या अनेक समस्या असल्याने होणाऱ्या नवजात बालकांच्या मृत्यूचे आणि विकृतीचे प्रमाण दिसत आहेत , ते कमी करण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी याकडे लक्ष केंद्रित करून आदिवासी भगिनींना दिलासा देण्यासाठी व नवजात बालकांची सुरक्षा व्हावी यासाठी एक विशेष मोहीम हाती घेवून होम बेस्ड न्यू बॉर्न केअर किट चे वाटप या कार्यात सेवा करणाऱ्या आशा वर्कर्स यांना दिल्या आहेत . यामुळे ग्रामीण व दुर्गम भागात आशा वर्कर्स च्या मदतीने नवजात बालकांची सुरक्षा होणार असल्याने उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सध्या शिवसेना ( उ बा ठा ) पक्षाचा शिवसंवाद बैठक दौरा १८९ खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असून तो यशस्वीरीत्या पूर्ण झाला . शिवसंवाद बैठक दौऱ्यात आपटी , नारंगी , गोरठण , नंदनपाडा , चिलठण , जांभिवली , वावोशी , खानाव , वनवठे , तांबाटी , तळाशी , वडवळ , होराळे , शिरवली , खरिवली या दौऱ्यात ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या एचबीएनसी कार्यात काम करणाऱ्या आशा वर्कर महिलांना त्यांच्या कार्यात अत्यावश्यक असणारी हि किट देण्यात आली .या माध्यमातून बालकांची घरच्या घरी काळजी कशी घ्यावी , याबाबत उपक्रम राबविण्यात येतो . या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आशा स्वयंसेविकांना विशिष्ट वस्तूंचे किट उपलब्ध करून देणे आवश्यक असते.
या योजनेंतर्गत आशा स्वयंसेविकांना विविध स्वरूपाच्या आरोग्यविषयक कामाची जबाबदारी देण्यात आलेली आहे . त्यात एचबीएनसी अर्थात घरच्या घरी बालकांची कशी काळजी घ्यावी, या कार्यक्रमाचा समावेश आहे . आशा स्वयंसेविकांना एचबीएनसी कार्यक्रमांतर्गत नवजात बालकांच्या घरी जाऊन गृहभेट देणे व भेटीच्या दरम्यान बालकाला पकडण्यापूर्वी हात धुण्याचे प्रात्यक्षिक , बाळाचे वजन , तापमान घेणे , बाळाला उबदार ठेवण्याच्या पद्धती मातेला समजावून सांगणे , श्वासाची गती मोजणे इत्यादी कृती आशा स्वयंसेविकांना कार्यक्रम दरम्यान करावयाच्या असतात. त्यादृष्टीने आशा स्वयंसेविकेकडे एचबीएनसी किट व त्यामध्ये डिजिटल घड्याळ , डिजिटल थर्मामीटर , वजन काटा , नवजात बाळा करिता छोटे ब्लॅंकेट , फिडिंग चमचा , साबण , साबणाचा डबा हे साहित्य आवश्यक आहे.

हे किट शासनाकडून अनेक वर्षांपूर्वी दिले गेले होते आणि त्यामध्ये अनेक वस्तू कालबाह्य देखील झाल्या होत्या , अनेकदा शासन स्तरावर मागणी करूनही हे किट उपलब्ध होत नव्हते , या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नवजात बालकांची सुरक्षा व्हावी , याची दक्षता म्हणून शिवसेना ( उ बा ठा ) पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी आशा वर्कर्स यांना आदिवासी भागात तसेच विविध पाड्यातील गरोगरीब जनतेच्या नवजात बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची किट उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात आले . या महत्त्वपूर्ण कार्यामुळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे . यावेळी उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्या समवेत खालापूर ता. प्रमुख एकनाथ पिंगळे , पंढरीनाथ राऊत , महिला संघटीका पाटील व इतर महिला पदाधिकारी , शिवसैनिक उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page