![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
वाकसई (प्रतिनिधी) : वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवार दि.24 फेब्रुवारी रोजी वाकसई ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली.
या निवडणुकीमध्ये महेंद्र बबन शिंदे व पुष्पा सुरेश देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननी व माघारी नंतर दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैद्य झाल्यानंतर उपसरपंच निवडीसाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये महेंद्र शिंदे यांना आठ तर पुष्पा देसाई यांना चार मते मिळाल्याने शिंदे यांचा विजय घोषित करण्यात आला. वाकसई ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच दीपक काशीकर व विस्तार अधिकारी अर्जुन गुडसुळकर यांच्या पिठासनाखाली व उपस्थितीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. कैलास काशिकर यांनी ठरवून दिलेल्या कालावधीत उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनोज जगताप, निलम शेलार, पुनम येवले,उषा देशमुख, गणेश देशमुख,कैलास काशिकर यांच्यासह भरत येवले, अंकूश देशमुख, मारुती देशमुख,निवृत्ती देशमुख,प्रतीक देसाई, प्रदीप येवले,अशोक कौदरे, नवनाथ देशमुख, गणपत विकारी, अमोल केदारी, शंकर शिर्के, बाळसाहेब येवले,अशोक ढाकोळ आदी मान्यवरांसह ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकालानंतर ग्रामपंचायत कार्यालय ते जेवरेवाडी गावापर्यंत काढण्यात आलेल्या जंगी मिरवणूकीत महिला व नागरिकांचा मोठा सहभाग होता.