Wednesday, September 27, 2023
Homeपुणेलोणावळानवनिर्वाचित ग्रामपंचायत सचिन कडू केला सत्कार..

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सचिन कडू केला सत्कार..


शिंग्रोबा उत्सव कमिटीचा स्तुत्य उपक्रम..

प्रतिनिधी- दत्तात्रय शेडगे

मावळ तालुक्यातील प्रतिष्टेची असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत कुरवंडे मधून निवडून आलेल्या नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य सचिन मारुती कडू यांचा शिंग्रोबा उत्सव कमिटी व कुरवंडे येथील धनगर समाज बांधव यांच्या वतीने यथोचीत सत्कार करण्यात आला.


कुरवंडे ग्रुप ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून यामध्ये वार्ड क्रमांक दोन मधून सदस्य पदासाठी सचिन मारुती कडू हे निवडून आले आहेत ,त्यांचा नुकताच शिंग्रोबा उत्सव कमिटी व कुरवंडे येथील धनगर समाज बांधव यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.


यावेळी ग्रामस्थ भाऊ शेडगे, युवा नेते बाळासाहेब (नारायण )हिरवे , शिंग्रोबा उत्सव कमिटीचे संस्थापक अध्यक्ष बबन शेडगे, बाळू शेडगे, अंकुश शेडगे, एकनाथ घाटे, विवेक योगे, आदीसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -