प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे.
मावळ तालुक्यातील नाणे मावळ आंदर मावळ या दोन्ही मावळांच्या पठारावरील गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात राहत असुन येथे अजूनही मूलभुत सुविधा मिळाल्या नाहीत, येथील रस्त्याच्या निधीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पठारावरील धनगर वाड्याना भेट देवून येथील समाज बांधवाना भेडसावणार्या समस्या जाणून घेतल्या ,
देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष उलटले तरीही नाणे ते कुसुर पठार हे विकासापासून लांब आहे, अजूनही येथे रस्ताच नसल्याने येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून आठ ते दहा किमी ची पायपीट ग्रामस्थांना करावी लागत आहे.
यावेळी धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून या रस्त्याला लागणारा निधी मंजूर करण्यात सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार गोपीचंद पडळकर यांनी येथील ग्रामस्थांना दिले,
यावेळी पठारावरील ग्रामस्थ व भाजप मावळ तालुका धनगर विकास परिषद यांच्या वतीने आमदार पडळकर यांचा याथोचीत सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर ,मावळ तालुका भाजप धनगर समाज परिषद अध्यक्ष नामदेव शेडगे, भाजप क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे,माजी सरपंच दत्तू आखडे, ग्रामस्थ रामभाऊ जानकर, नावदेव आखाडे, विठ्ठल शेडगे,राम शेडगे,कोंडीबा ठिकडे राजू ठिकडे, शंकर आखाडे, शंकर ठिकडे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.