नातेपुते ग्रामीण रूग्णालयात कोविड सेंटर सुरू करा.. पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे केली मागणी..

0
28

खोपोली(दत्तात्रय शेडगे )सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांची इंदापूर येथे अक्षय भांड यांनी भेट घेऊन नातेपुते ग्रामीण रूग्णालयात (DCHC) कोविड सेंटर उभे करण्याची केली मागणी.

तर पालकमंत्री भरणे यांनी या मागणीची दखल घेत नातेपुते येथे ग्रामीण रूग्णालयात कोविड सेंटर उभा करण्याबाबत भरणे संबधीत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.माळशिरस तालुक्यात रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

त्यामुळे नातेपुते म्हणजे माळशिरस तालुका पश्चिम भागामध्ये कोविड सेंटर उभा राहण्याची गरज आहे त्यामुळे अनेक लोकांना त्याचा लाभ होईल असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अक्षय भांड यांनी व्यक्त केले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सहकारी रियाज शेख,डॉ. पाटील,व विलास भोसले हे उपस्थित होते.