Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" नारी शक्तीची ताकद व शिवसैनिकांची साथ " आमच्या पाठीशी उभी असल्याने...

” नारी शक्तीची ताकद व शिवसैनिकांची साथ ” आमच्या पाठीशी उभी असल्याने आमचा विजयी निश्चित – आमदार महेंद्र शेठ थोरवे..

कर्जत मतदार संघात विरोधकांची फरफट ” कोणता झेंडा घेवू हाती “..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघात शिवसेनेच्या वतीने पुन्हा एकदा ” विजयी ” संपादन करून या मतदार संघावर ” भगवा ” फडकविण्यासाठी सज्ज झालेले ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” या मतदार संघात ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ” अभियान व आढावा बैठका घेवून तळागाळात , गावागावात पोहचत आहेत . आज गुरुवार दिनांक १७ ऑक्टोंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता ” अंकल किचन ” येथे आयोजित कार्यक्रमास महिला भगिनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . यावेळी ठाकरे गट , मनसे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हादरा देत येथे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते व महिला वर्गाची शिवसेनेत कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विकास कार्याची होत असलेली घौड दौड व सर्वत्र नंदनवन होत असल्याने पक्ष प्रवेश झाला.

यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की , माझ्या पाठीमागे ” माझ्या बहिणी , नारी शक्तीची ” ताकद असल्याने आपला विजयी पुन्हा एकदा निश्चित असून येथे भगवाच फडकणार , असा दावा केला . महिला भगिनी यांच्यासाठी मान. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ” महिला सक्षमीकरण व त्यांचे सबळीकरण ” व्हावे , यासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून , सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत आहे . हा घेतलेला क्रांतीकारी निर्णय , जनजागृती व शिबिरे घेवून त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहचली पाहिजे , असा आदेश त्यांनी महिला आघाडी व शिवसेना पदाधिकारी यांना दिला . या मतदार संघात आम्ही भरीव निधी आणून विकास केला आहे , तब्बल २९०० कोटी निधी आणला आहे , सर्व क्षेत्रात , सर्व समाजात काम केले आहे , खोपोलीत १०० कोटी निधी आणून ” भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज ” यांचे स्मारक , मोठ्या प्रमाणात कर्जतमध्ये ऐतिहासिक वास्तू निर्माण केले आहे , प्रती पंढरपूर – आळंदी , छत्रपती संभाजी महाराज स्मारक , शिवशाही अवतरली आहे , या विकास कार्यावर कर्जत मतदार संघावर ” शिवसेनेचा भगवा ” फडकणारच यावर प्रकाश टाकला . म्हणूनच वज्रमूठ सारखे एकत्र या , शिव सैनिकांची ताकद व नारी शक्ती आमच्या पाठीशी आहे , हीच आमच्या ” विजयाची नांदी ” आहे , असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र शेठ थोरवे , संपर्कप्रमुख विजय पाटील, जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर, जेष्ठ नेते हनुमंत शेठ पिंगळे , सल्लागार निवृत्ती पिंगळे, संपर्क प्रमुख पंकज पाटील, युवासेना जिल्हाधिकारी अक्षय पिंगळे , उप जिल्हाधिकारी निखिल पाटील , तालुका प्रमुख संदेश पाटील , मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे , युवासेना अधिकारी रोहित विचारे , मा. नगरसेवक मोहन औसरमल , मा. उपसभापती विश्वनाथ पाटील , एच. आर. पाटील , संपर्कप्रमुख संजय देशमुख , प्रवक्ते सुरेश देशमुख , खालापूरच्या नगराध्यक्षा रोशनी मोडवे, महिला आघाडीच्या विधानसभा संघटिका कांचन जाधव , खालापूर ता. संघटीका रेश्मा आंग्रे , अर्चना लाड , खोपोली संघटिका प्रिया जाधव , संध्या जाधव , नीलम चोरगे , शीतल डोगले , माधवी रिठे , अर्चना पाटील , योगिता देशमुख , मीनल सावंत , संतोष मुंढे , गणेश पाटील , जितेंद्र सकपाळ , अजीम मांडलेकर , मा. नगरसेवक राजू गायकवाड , संतोष मालकर , डॉ. शेखर जांभळे , प्रवीण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , जेष्ठ नेते हनुमंत शेठ पिंगळे , शीतल डोगले , प्रिया जाधव , यांनी देखील मार्गदर्शन केले .
- Advertisment -

You cannot copy content of this page