Tuesday, September 26, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडनिजामपूर जिल्हापरिषद गटासाठी रासप कडून संतोष ढवळे धनविकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब..

निजामपूर जिल्हापरिषद गटासाठी रासप कडून संतोष ढवळे धनविकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब..

खोपोली( दत्तात्रय शेडगे )
आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षाने लढविण्याचा निर्णय घेतला असून आतापासून उमेदवारांची चाचपनी करण्यात आली आहे. रायगडजिल्हातील महाड पोलादपूर मतदार संघातील निजामपूर जिल्हा परिषद गटासाठी रासप कडून युवा नेते संतोष ढवळे धनविकर यांचे नाव पक्षश्रेष्टीकडून देण्यात आले आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात आगामी होणाऱ्या विधान सभा आणि जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी केली आहे,
यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ही बैठक घाटकोपर मुबंई येथे नुकतीच पार पडली.

यावेळी मुबंई महानगरपालिकेसह कोकण विभागातील जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्वबळावर लढण्याची आणि त्यासाठी उमेदवारांची चाचपणी करण्यात आली यावेळी पक्षश्रेष्ठींकडून मुबंई महानगर पालिकेसाठी वार्ड क्रमांक 128 मंगेश कोयंडे, वार्ड क्रमांक 133 महेश झोरे, वार्ड क्रमांक 140 प्रकाश डांगे तर, रायगड जिल्ह्यातील निजामपूर जिल्हा परिषद गटासाठी संतोष ढवळे धनविकर, लोणशी गटासाठी सूर्यकांत टेंबे, माणगाव पंचायत समिती निमाजपुर गण रवींद्र सुतार, आदी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली असून आजुनही काही ईत्तर पक्षातील नाराज उमेदवार संपर्कात असल्याची बातमी समोर येत आहे.


या बैठकीला रासपचे मुख्य महासचिव माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले, उत्तर महाराष्ट्र प्रभारी माणिकरावजी दांगडे पाटील, कोकण प्रदेश अध्यक्ष भगवान ढेबे, ईशान्य मुबंई जिल्हा अध्यक्ष वसंत कोकरे, लेंगरे, कोलापटे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे धनविकर, घाटकोपर तालुका अध्यक्ष मंगेश झोरे, मानखुर्द तालुका प्रमुख प्रकाश डांगे, युवा अध्यक्ष सुनील झोरे आदी उपस्थित होते,

- Advertisment -