निष्ठावंत शिवसैनिक सुरेश बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची सदिच्छा भेट !

0
50

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)कर्जत तालुक्यातील शिवसेनेला उत्तरोउत्तर वाढविण्याचे काम करणारे रेल्वे पट्ट्यातील शिवसेनेचे हालीवली येथील माजी विभागप्रमुख सुरेश बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत – खालापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी त्यांच्या रहात्त्या घरी हालीवली येथे जाऊन सदिच्छा भेट दिली व वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या समवेत शुभेच्छा देण्यासाठी उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , तालुका प्रमुख उत्तमदादा कोळंबे , तालुका संघटक शिवराम बदे , उपतालुकाप्रमुख भरत डोंगरे , विधानसभा संघटक पंकज पाटील,मराठा समन्वयक अरुण देशमुख, उपसरपंच केतन बोराडे,जयवंत बोराडे,पिंगळे भाऊ,अनिल खंडागळे यावेळी उपस्थित होते.हालीवली ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेनेचे अत्यंत निष्ठावंत, प्रामाणिक, कर्तव्य दक्ष माजी विभाग प्रमुख सुरेश मुकुंद बोराडे यांची प्रकृती गेले काही दिवस ठीक नव्हती . त्यातच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शिवसैनिकांची आठवण ठेवून त्यांना वाढदिवसाच्या व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी त्यांची भेट घेतली , व शुभेच्छा दिल्या.

शिवसेनेच्या जडणघडणीत व आत्ताच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रेल्वे पट्ट्यातील शिवसैनिकांनी मोलाचे सहकार्य करून आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना निवडून आणले होते , यांत मा. विभागप्रमुख सुरेश बोराडे तसेच हालीवली सरपंच सौ . प्रमिला सुरेश बोराडे यांचा खारीचा वाटा होता . हिच मोलाची जाण ठेवून आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची भेट खूप महत्त्वाची ठरली आहे . यावेळी आलेल्या मान्यवरांचे शाल – पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन आदर सत्कार बोराडे दाम्पत्यांनी केले . यावेळी हालीवली ग्रामपंचायत हद्दीतील अनेक मान्यवर व शिवसैनिक , ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.