Wednesday, September 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडनेरळचे डम्पिंग ग्राउंड अन्यत्र स्थलांतराची राजेंद्र गुरूनगर राहिवाश्यांची मागणी..

नेरळचे डम्पिंग ग्राउंड अन्यत्र स्थलांतराची राजेंद्र गुरूनगर राहिवाश्यांची मागणी..

 
दि.23 नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्र नगर येथील राहिवाश्यानी साठवण केलेल्या कचऱ्याचा त्रास होत असल्याने कर्जत कल्याण महामार्गालगतचे नेरळचे डंपिंग ग्राऊड अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे.


 राजेंद्रगुरु नगर येथून जवळच कर्जत – कल्याण महामार्गालगत ग्रामपंचायत नेरळचे डंपिंग ग्राऊड आहे . सदर डंपिंग ग्राऊंडमध्ये संपूर्ण नेरळ शहराचा कचरा जमा होत असतो, त्यामुळे त्याचे नियमित व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.

वास्तविक नागरी वस्तीच्या जवळ डंपिंग ग्राऊंड साठी जागेचा वापर करणे हे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी तसेच शहराच्या विविध भागातून येणारी -जाणारी वाहने महामार्गावरुन जात असल्यामुळे आणि त्या वाहनांच्या मागील वेगाच्या वाऱ्यामुळे कचरा इतस्ततः पसरतो आणि सभोवतालचा सगळा परिसर हा दुर्गंधी व कचरायुक्त होत असतो.


त्यामुळे कचरा टाकण्यासाठी अन्यत्र डंपिंग ग्राऊंड करावे तसेच साचणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करुन कचऱ्यापासून पूनर्निर्मिती होईल असे बायोगॅस किंवा सेंद्रिय खत निर्मिती असे प्रकल्प निर्माण केल्यास त्यामुळे ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळेल व परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल . या अर्जाचा गांभीर्याने विचार करुन आमच्या परिसरातील डंपिंग ग्राऊड अन्यत्र जेथे नागरिकांची वर्दळ व रहिवास नाही अशा जागी करावी तसेच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे अशी मागणी राहिवाश्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page