नेरळमध्ये वंचितचा झंझावात सुरुच,अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश !

0
52

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्रात पक्षप्रवेश व इतर कार्याचा झंझावात सुरू आहे.कर्जत तालुक्यात देखील तालुका अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुक्यात त्याचप्रमाणे नेरळ शहरात अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश केला आहे.

वंचितचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी नेरळ शहर अध्यक्ष म्हणून मुकेश गायकवाड यांची निवड करण्यात आली होती, तेव्हापासून नेरळ शहरात वंचित बहुजन आघाडीचा झंझावात सुरू आहे. दि ८ ऑगस्ट २०२१ रोजी नेरळ शहरातील कोबल वाडी येथील सुनील लाडके,काळू परमार,ऋषी कपूर,मनोज परमार,साजिद पावसकर,राजेश परमार,राशीद चौधरी,अशोक गुप्ता,शमशाद खान,पपु वाघमारे,करण चौधरी,शाकीब चौधरी,हाफीजा सिकंदर,रेहना चौधरी,चमणबी खान,दर्शना लाडके,सुनीता कपूर,कौशल्या वाघमारे,सिमा नांदगावकर,सना बेग,आलिया बेग,गजरा वाघेला,आदी असंख्य कार्यकर्त्यांनी वंचित मध्ये प्रवेश केला.

यावेळी नेरळ शहर अध्यक्ष मुकेश गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले.उपस्थित, ता.सहसचिव प्रमोद बार्हे,ऍड निलेश वानखेडे ,नेरळ महिला अध्यक्षा,सुजाता तायडे,नेरळ संघटक संदेश ठाकरे,सचिव संजय मोरे,मोहाची वाडी अध्यक्षा मीनाक्षी पांडव,देविदास जोंधळे आदी पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद खैरे यांनी केले.