दि.१८ कर्जततालुक्यातील नेरळ परिसतील असलेले पिंपळोलीगावातील अज्ञानांत मंगळवारी मध्यरात्री तीन खाजगी स्कुल बस पेटवून देण्यात आल्या होत्या,याप्रसंगी पिंपळोलीतील ग्रामस्थांनी अग्निशमन दलाचे बंब पोहोचपर्यंत ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, यावेळी घटनास्थळी तिन्ही स्कुल बस जळून खाक झाल्या,यासंदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यावेळी पिंपळोली गावातील चंद्रकांत सोनवणे यांच्या मालकीच्या तीन खाजगी स्कुल बस होत्या,कोरोनाच्या महामारीत काळात शाळा बंद असल्याने गावाजवळ मोकळ्या मैदांनात उभ्या करणयात आल्या होत्या,त्याच ठिकाणी मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांनी या बस पेटवून दिल्या सदर या घटनेची गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारंगवर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्याप्रमाणे पिंपळोली गावातील चंद्रकांत सोनवणे यांची काही नागरिकांसी क्षुल्लक वाद झाल्याचं असे सांगितले, त्यामुळे वादातून हा प्रकार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. यासंदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले,घटनास्थळी पिंपळोली गावात तणाव वाढू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.