if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस व शेकाप च्या अनेक कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत पक्षप्रवेश…
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) दोनच दिवसांपूर्वी नेरळ जिल्हा परिषद विभागातील दामत गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, तालुका संघटक सुनील रसाळ, तालुका अल्पसंख्याक प्रमुख फाईक खान, मुन्ना भाई उपस्थित असताना आज आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कळंब जिल्हा परिषद विभागातील साळोख ग्रामपंचायत हद्दीतील काॅंग्रेस पक्षाचे कर्जत तालुका अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष श्री.सोएब बुबेरे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते शिवराम आगिवले, ग्रामपंचायत सदस्य यतिश आगिवले, रामदास वाघ, मुस्तकिम बुबेरे,मिझाब बुबेरे,समिर जुवारी,साबीर जुवारी, अजिज बेग, इम्तियाज शेख, सुभाष मुकणे,बाळु चवर,या प्रमुखांसोबत असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे नेरळ सहित कळंब जिल्हा परिषद व सालोख ग्रामपंचायत मधील शिवसेनेची ताकद वाढली असून भविष्यकाळात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तसेच संघटन वाढीसाठी याचा निश्चितच फायदा होणार आहे. दिवसेंदिवस शिवसेनेत होत असलेले पक्ष प्रवेशातून आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे सक्षम नेतृत्व व होणारा विकास समजुन येत आहे , त्यांचे हात ही मजबूत होत आहेत .त्यामुळे विरोधक हादरले असून हा शिवसेनेचा महेंद्रशेठ थोरवे नावाचा वारू रोखणार कसा ? याचा विचार करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, विधानसभा संघटक शिवराम बदे,माजी उपसभापती मनोहर थोरवे, उपतालुकाप्रमुख भरत डोंगरे, अल्पसंख्याक तालुका प्रमुख फाईक खान,उपतालुका संपर्क प्रमुख प्रशांत झांजे,माजी सभापती राहुल विशे, विभाग प्रमुख भरत हाबले, पंचायत समिती विभाग प्रमुख भानुदास राणे, रविंद्र ऐनकर, विभाग संघटक रविंद्र फोपे, उत्तम शेळके, एकनाथ शेळके, विभाग संपर्क प्रमुख रामचंद्र बदे, नारायण बदे, संतोष भुंडेरे,मोहन वेहेले,मुसा पाटील,वाहीद जुवारी, अशोक दहीवलीकर,लाला भातभरडे उपस्थित होते.