नेरळ- माथेरान घाटात फियाट कारचा भीषण अपघात..

0
55दि 22 नेरळ- माथेरान घाटात फियाट कारचा अपघात घडला आहे.मद्यपान करून वाहन घाट रस्त्यात वाहने चालविली जात असल्याने हा अपघात झाला आहे.या अपघातात वाहन चालक आणि त्याचा मित्र जबर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे.


जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकणी दोन तरुण खाजगी वाहनाने फिरण्यासाठी आले होते.माथेरान फिरून झाल्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान घाटातील अवघड वळण समजल्या जाणाऱ्या जुमापट्टी येथील एस टन येथे वाहनचलकाचा गाडी वरील ताबा सुटल्याने फियाट कंपनीची असलेली कार समोरच्या आंब्याच्या झाडावर जाऊन धडकली.

हा अपघात एवढा जबर होता की वाहनाचा दर्शनी भाग पूर्णतः चक्काचूर झाला होता.अपघातात तुरणांच्या पायाला जबर मार बसला असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले होते.अपघातातील तरुण हरीचंद किसनचंद देवनानी (नेरूळ) तर हरिराम गुरुदासमन पंजावणी (उल्हासनगर) येथील राहणार असून प्रवासादरम्यान ते मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. नेरळ-माथेरान घाट रस्त्यातील मागील आठ दिवसातील अपघाताची ही तिसरी घटना आहे.