भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
पुराचे पाणी घरात गेल्याने कर्जत शहरातील अनेकांच्या घरातील वस्तूंचे ,अन्न – धान्यांचे नुकसान झाले,त्यामुळे भरला संसार उघड्या डोळ्यासमोर खराब झाल्याने आता नुसते पंचनामे करू नका,तर त्यांना धीर देऊन शासनाने तातडीने सरसकट मदत करण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या रणरागिणी नेत्या तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी सरकारला केले आहे,त्या कर्जतमध्ये पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या , त्यावेळी बोलत होत्या.
कर्जतमध्ये २१ जुलै च्या रात्री पडलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पावसाचे पाणी साठले होते. अचानक आलेल्या पुरामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.घरात पाणी शिरल्याने घरातील अनेक मौल्यवान वस्तू खराब झाल्या तसेच घरातील अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात भिजल्याने नासाडी झाली.काही लोकांचे कपडे ,सोफे, शासकीय कागदपत्रे, तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची अक्षरशः माती झाली आहे.
ह्या सर्व गोष्टी लक्षात घेत आज महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी कर्जत मधील विविध भागांची पाहणी केली.यावेळी पूरग्रस्त नागरिकांना आधार आणि धीर देत नगरसेवकांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी आवाहन देखील केले.विठ्ठल नगर परिसरातील मनोहर कडू यांच्या घरापासून या पाहणी दौऱ्यास सुरुवात करण्यात आली.पूरग्रस्तांच्या घरातील शासकीय कागदपत्रे व इतर वस्तूंचे नुकसान झाले असल्यास त्यांना तत्काळ पूरग्रस्त दाखले काढून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
गरजूंना राहण्यासाठी तात्पुरता निवारा तसेच गरजुंची भूक भागविण्यासाठी कम्युनिटी किचन चालू करून देण्यात यावे अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली. त्यानंतर शनी मंदिर आमराई परिसरात भेट दिल्यानंतर दहीवली परिसराची पाहणी करण्यात आली. सर्व पूरग्रस्तांसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल,यासाठी मा.मुख्यमंत्री , पालकमंत्री , जिल्हाधिकारी यांच्याकडे बोलू असे आश्वासन त्यांनी पूरग्रस्तांना दिला.
यावेळी भाजप कोकण किसान मोर्चा चे संपर्कप्रमुख सुनील गोगटे , तालुका सरचिटणीस राजेश भगत, तालुका सरचिटणीस संजय कराळे, कर्जत शहर अध्यक्ष तथा नगरसेवक बळवंत घुमरे,शहर सरचिटणीस प्रकाश पालकर, तालुका महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा गोगटे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, युवा मोर्चा शहर अध्यक्ष मयूर शितोळे , युवा मोर्चा सरचिटणीस संदेश कराळे, जिल्हा महिला महिला मोर्चा चिटणीस विनिता घुमरे, शहर महिला अध्यक्ष सरस्वती चौधरी, कोकण सोशल मीडिया सेलच्या ऍड .गायत्री परांजपे,
कर्जत नगरपालिकेच्या नगरसेविका स्वामिनी मांजरे, विशाखा जिनगिरे , भटके – विमुक्त कोकण अध्यक्षा सुषमा ढाकणे, मनिषा ढुमणे, समीर सोहनी, शर्वरी कांबळे ,स्वप्ना सोहनी, मिलिंद खंडागळे ,अभिनय खांगटे, सुर्यकांत गुप्ता, सर्वेश गोगटे, सोनाली अथणीकर, मंगेश भोईर, विजय जिनगिरे, मारुती जगताप, रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस संतोष भोईर , राहुल कुलकर्णी, सुप्रिया भगत आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.