Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपक्ष बांधणीवर नव्याने जोर देऊन खुंटलेली ताकद पुन्हा वाढवणार :- खासदार सुनील...

पक्ष बांधणीवर नव्याने जोर देऊन खुंटलेली ताकद पुन्हा वाढवणार :- खासदार सुनील तटकरे..

कर्जत तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न !

भिसेगाव – कर्जत /सुभाष सोनावणे-
रायगड जिल्ह्यातील कर्जत मतदारसंघात तुलनात्मक दृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाढ खुंटली असली तरी पक्ष बांधणीवर नव्याने जोर देऊन पक्षाची ताकद कशी वाढेल,याचा प्राधान्य क्रमाने विचार केला जाईल,असे स्पष्ट प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी कर्जत येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समोर व्यक्त केले.

कर्जत – खालापूर मतदार संघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ लाड यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वाची आढावा बैठक (9 ऑक्टोबर) दहिवली राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी भविष्यात पक्ष बांधणी व पक्ष वाढीसाठी सर्वांच्या मदतीची गरज असेल
रायगड जिल्ह्याबरोबरच कर्जत मतदार संघातील ताकद तुलनात्मक दृष्ट्या कमी झालेली असली तरी भविष्यात पक्ष बांधणीवर नव्याने जोर देऊन पक्षाची ताकद वाढवणार अशी भीष्मगर्जना रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केली.

रायगडच्या पालकमंत्री कु .अदिती तटकरे यांनी भविष्यात विकास कामांत कर्जत तालुक्याला झुकते माप देऊ रायगड चा विकास घडविण्यासाठी प्रत्येक विभागात आढावा बैठक घेऊन समस्या सोडवू , असे मत व्यक्त करून यासाठी माझे वडील खासदार सुनील तटकरे व काका जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ लाड यांचे मार्गदर्शन कामी येईल , असे मत व्यक्त केले.
तर जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ लाड यांनी पक्षातील अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवून पक्ष मजबूत करण्यासाठी संघटीत काम करण्याचे तालुक्यातील पदाधिकार्‍यांना सांगितले. यासाठी गावोगावी बूथ कमिटी स्थापन करून सर्वांना काम करण्याची संधी मिळून पक्षाचीही ताकद निश्चितच वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रश्न , कोंडाणा धरण विषय , कोविड सेंटर रुग्णालयाची कमतरता , तसेच इतर समस्यांग्रस्त अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले .महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने वृद्ध कलावंत यांना मानधन देण्याच्या कमिटीवर जिल्हाध्यक्ष पदावर झालेल्या नियुक्तीमुळे एकनाथ धुळे यांचा सत्कार खासदार सुनील तटकरे यांनी केला. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी तालुक्यातील समस्यांबाबत अनेक प्रश्न विचारले.
सदर आढावा बैठकीस खासदार सुनील तटकरे , पालकमंत्री अदिती तटकरे , माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ लाड , राजिप माजी अध्यक्ष सुरेश टोकरे , शिक्षण – आरोग्य सभापती सुधाकर घारे , महिला बाल कल्याण सभापती गीता जाधव , गीता पालरेच्या , जेष्ठ नेते तानाजी चव्हाण , तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव , सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष एकनाथ धुळे , नगरसेवक शरद लाड , युवा ता . अध्यक्ष सागर शेळके , महिला संघटक प्रतीक्षा लाड , माजी नगराध्यक्ष राजेश लाड ,भास्कर दिसले त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य , नगरसेवक , सरपंच , सदस्य तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page