Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपञकाराना देखील कोव्हीड प्रतिबंधक लस द्या...

पञकाराना देखील कोव्हीड प्रतिबंधक लस द्या…


खालापूरातील पञकाराची शासनाकडे मागणी..

प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे.

कोरोनाचा वाढता प्रभावामुळे वृत्त संकलनासाठी जाणा-या पञकाराना देखील कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण करावे अशी मागणी खालापूरातील पञकारानी तहसीलदार इरेश चप्पलवार यांचेकडे केली आहे.गेल्या वर्षभर धुमाकूळ घालून काही कालावधी करता शांत झालेला कोरोना विषाणू पुन्हा डोक वर काढत आहे.

खालापूरात कोरोना संसर्गाने आतापर्यंत 125बळी घेतले आहेत.सध्या खालापूर तालुक्यातील आरोग्य कर्मचारी,पोलीस तसेच पंचायत समितीसह सर्व शासकिय कर्मचा-यांना कोव्हीड प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.कर्जत उपजिल्हा रूग्णालय येथे लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू आहे.

लोकशाहिचा चौथा स्तंभ म्हणून पञकाराना संबोधले जाते.त्यामुळे पञकाराना देखील कोव्हीड लस देण्याची मागणी लेखी निवेदना व्दारे तहसीलदार कार्यालयाकडे करण्यात आली.पञकार मनोज कळमकर, रविंद्र जाधव,अमित भोपतराव,दिपक जगताप,प्रसाद अटक ,नगरसेवक किशोर पानसरे उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page