Monday, April 15, 2024
Homeक्राईमपत्ता विचारण्याच्या बहाण्याने व्यावसायिकावर अज्ञातांकडून गोळीबार हल्ल्यात व्यवसायिक गंभीर जखमी

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने व्यावसायिकावर अज्ञातांकडून गोळीबार हल्ल्यात व्यवसायिक गंभीर जखमी

व्हिडिओ पहा ,👆 क्लिक करा

कामानिमित्त अंदर मावळातील वाहनगाव कडे जाणाऱ्या व्यावसायिकाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गोळीबार करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सकाळी ९च्या दरम्यान घडली आहे अज्ञातांनी केलेल्या गोळीबारामध्ये चार गोळ्या लागल्याने व्यवसायिक गंभीर जखमी झाला आहे

मिलिंद मणेरीकर असे जखमी झालेल्या पन्नास वर्षेय व्यावसायिकाचे नाव असून मणेरीकर हे आपल्या XUV कार मधून चेतन निमकर या मित्रासोबत कामानिमित्त वाहनगाव येथे असलेल्या संकल्प फार्म हाऊस वर जात होते

वडेश्वर वाहनगावा दरम्यान दुचाकी मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांची कार थांबून हांडे पेट्रोल फॉर्म कोठे आहे असे पत्ता विचारण्याचा बहाणा केला दुचाकीस्वारांना माहिती देण्यासाठी मणेरीकर यांनी आपल्या कारची काच खाली घेतली असता दुचाकीवर मागे बसलेल्या अज्ञात इसमाने त्याच्याजवळ असलेल्या गावठी पिस्तोल मधून मनेरीकर यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या व काही कळण्याआधीच घटनास्थळावरून दोघे पसार झाले हल्ल्यात मनेरीकर यांच्या मानेला एक गोळी घासून गेली असून त्यांच्या पोटात तीन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत स्थानिकांची मदत घेत जखमी मणेरीकर यांना तात्काळ सोमाटणे येथील पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे

- Advertisment -

You cannot copy content of this page