पत्रकार दिनानिमित्त खालापूर पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम..

0
85


पत्रकारांना पोलीस स्टेशनच्या कामकाजाची दिली माहिती.

खोपोली- दत्तात्रय शेडगे

मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत खालापूर पोलिसांनी संपूर्ण पोलीस स्टेशन मध्ये चालणाऱ्या कामकाजाची माहिती पत्रकारांना देत पत्रकारांचा सन्मान करत मराठी पत्रकार दिन साजरा केला.


6 जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत खालापूर पोलीस स्टेशन मध्ये पत्रकार दिन साजरा करण्यात आला, यावेळी खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी पत्रकारांचा सन्मान करून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये चालणाऱ्या कामकाजाची माहिती दिली तर पोलिसांजवळ असलेल्या बंदुकीची माहिती पत्रकारांना देऊन एक आगळा वेगळा पत्रकार दिन साजरा करण्यात आला, यावेळी तालुक्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होतेे.